Saturday, 14 September 2013

"क्या तुमने ईश्वर को देखा हैं?"

आओ दोस्तो ... मैं आप को एक कहानी सुनता हू ..
ये उस वक़्त की कहानी हैं जब मैं एक साधुसे मिला था ..
उसने मुझसे पूछा "क्या तुमने ईश्वर को देखा हैं?"

मैं सोचने लगा "क्या मैने ईश्वर को देखा हैं?"

"हा" मन बोला "मैने ईश्वर को देखा हैं"
"ये मंदिर हैं .. यहा मैने ईश्वर को देखा हैं ..
वो मस्जिद हैं .. वहा मैने मैने ईश्वर को देखा हैं ..
ये चर्च ... ये गुरुद्वारा ... कैसे बताऊ कहा कहा उसे देखा हैं ..
कभी एकही ईश्वर को देखा हैं ... मंदिर मस्जिद गिरिजाघर में ..
ना बोल रहा था .. ना सुन रहा था .. ना चल रहा था   
ना हिल रहा था .. ना डूल रहा था ...
बस चुपचाप खडा था .. बुत बने ...
सामने कुछ भी रखो ..  ना खाता हैं ना पीता हैं
उस चीज को उठाना तो दूर छुता भी नही हैं  
कभी हजारो ईश्वर देखे ... किसी एक ईश्वर के सामने झुकते हुवे"

मैने साधुसे हसकर कहा "हा . . . मैने ईश्वर को देखा हैं"
मैने उससे पुछा "क्या तुमने ईश्वर को देखा हैं?"
उसने कहा "नही .... अब तक मुझपे उसकी कृपा नही हुई हैं .. मैने ईश्वर को नही देखा"
मैं अचंबित हो गया ..

मैने मन से पूछा "जो मैने देखा, वह तो उसने भी देखा ..
फिर वह क्यू कहता हैं के उसने नही देखा?"

मन ने जवाब दिया "चाहे तो देखा सकता हैं, पर वह चाहता नही हैं"
मैने कहा "पर वह तो चाहता हैं के वह ईश्वर को देख सके"

"वह कहता हैं के वो चाहता हैं .... पर
कहना और चाहना दो अलग बाते हैं"
मैने पूछा "ये कैसे पता चले के इसमे क्या अंतर हैं ?"

"आसान हैं ... सिर्फ कहनेसे कुछ नही होता हैं ..
चाहने के लिये पहले चाह पैदा होना जरुरी हैं ...
जब ठोकर लगती हैं तो मुह से आह निकलती हैं ..
उस आह से ... उस वेदना से मुक्ती पाने के लिये 
जो चीज जरुरी होती हैं उसकी चाह मन में पैदा होती हैं ..
हम उस चीज को ढुंढते हैं ... वो नही मिलती तो उसकी चाह बढती हैं और ..
उसे पाने की आस हममे पैदा हो जाती हैं ..  

अब बताओ .. पानी कब चाहिये होता हैं ?
जिसके गले में .. शरीर में सुखेपन की वेदना होती हैं ..
उसे पानी की आस लगती हैं ... अर्थात प्यास लगती हैं ..
प्यास क्या हैं ... पाने की आस हैं  वही प्यास हैं ...

वैसे ही जब वेदना और पीडा होती हैं  ..तो ईश्वर की आस होती हैं ..
जिसे ईश्वर की आस हैं, जिसे ईश्वर की प्यास हैं वही ईश्वर को देख सकेगा"

मैने पुछा "क्या जिसे ईश्वर की प्यास हैं वह ईश्वर को पा सकेगा?"
मन बोला " नही .... वह ईश्वर को देख तो सकेगा ... मगर
जिसे देखा वह ईश्वर हैं ये कैसे कह सकते हैं? ये ईश्वर क्या हैं? "

मैं सोचता रह  गया ..

कुछ पल बाद मन बोला "ईश्वर एक प्यास का अंत हैं ..
वह एक अहसास हैं ... इस एहसास को जब जान लो .. 
तो उसे पहचान लोगे"
मैने पुछा "क्या उसके अहसास होने पर उसे पा सकते हैं?"

"नही ... उसकी पहचान तो हो जाती हैं .. पर वह काफी नही हैं ..
पानी के पहचान से प्यास तो नही बुझती .. 
प्यास तब बुझती हैं जब पानी पी लोगे .. 
वैसेही जब इस अहसास को अपने अंदर महसूस करोगे .. 
तब उसे पा लोगे"

"जिसने दुध के बरे में सुना हैं वह अज्ञानी हैं
जिसने दुध को देखा हैं वह आधा ज्ञानी हैं
जिसने दुध को पिया वही ज्ञानी हैं 
क्योकी वही बता सकेगा के दुध और सफेद पानी में क्या फरक हैं"

Wednesday, 28 August 2013

Same To Same मुखडा

गाण्याला चाल लावणे ही एक दुर्मिळ कला आहे.
संगीतकार चाल देताना बरेचदा एकच रागावर दोन-तीन-चार गाणी करतो आणि आपल्या कानांना ती अगदी सारखीच वाटतात.
बरेच संगीतकार चक्क एकमेकांच्या चाली ढापतात.
कधी कधी अगदी एकच चाल दोन संगीतकारांनी कुठून तरी ढापली आणि आपल्या गाण्यांना वापरली हेदेखील आपण पहिले. आठवते ना .... "जुम्मा चुम्मा दे दे" आणि "तम्मा तम्मा लोगे" ? आपलीच चाल कशी मूळ चाल आहे यावर त्यांचे प्रवचन देखील ऐकले.

कधी कधी एकच चाल दोन वेगवेगळ्या गाण्यांना लावलेली देखील आपण ऐकली ना? पहा आठवून
हृदयनाथ मंगेशकर
जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजती  - जैत रे जैत
होली आयी होली आयी होली आयी होली रे - मशाल
किंवा ताजे उदाहरण ...
अजय अतुल 
कोंबडी पळाली - जत्रा
चिकनी चमेली – अग्निपथ

आज मी जी गाणी सांगणार आहे ती वेगवेगळ्या काळात अगदी सेम टू सेम मुखडा वापरून केलेली गाणी आहेत.

मदन मोहन
आप की परछाइया - १९६४
गीतकार - राजा मेहदी अली खान
गायक - मोहम्मद रफी
पडद्यावरील कलाकार - धर्मेंद्र, सुप्रिया चौधरी
यही ही तमन्ना, तेरे दर के सामने
मेरी जान जाये मेरी जान जाये

राहुल देव बर्मन
नरम गरम  - १९८१
गीतकार -  गुलझार
गायक - आशा भोसले
पडद्यावरील कलाकार - स्वरूप संपत, अमोल पालेकर
हमे रास्तोंकी जरुरत नही हैं
हमे तेरे पावोंके निशान मिल गये हैं

राहुल देव बर्मन
सागर   - १९८५
गीतकार -  जावेद अख्तर
गायक - किशोर कुमार, लता मंगेशकर
पडद्यावरील कलाकार - डिम्पल, ऋषी कपूर
सागर किनारे, दिल ये पुकारे
तू जो नही तो मेरा कोई नही हैं

तीनही गाणी पूर्ण ऐका आणि आपले मत कळवा.

Wednesday, 14 August 2013

ईश्वर



ईश्वर एक आस हैं
ईश्वर एक प्यास हैं
ईश्वर एक एहसास हैं

ईश्वर एक साधना हैं
ईश्वर उपासना हैं
ईश्वर आराधना हैं

ईश्वर कभी नारी हैं
ईश्वर कभी कुमारी हैं
ईश्वर कभी बुढ्ढा हैं
ईश्वर कभी बच्चा हैं
झूठे के लिये अच्छा हैं
अच्छे के लिये सच्चा हैं

ईश्वर एक दर्पण हैं
ईश्वर एक अर्पण हैं
ईश्वर समर्पण हैं

ईश्वर बहोत प्यारा हैं
ईश्वर सबसे न्यारा हैं
उसे पाना एक मजा  हैं
उसे पाना कभी एक सजा हैं

ईश्वर एक मेल हैं 
ईश्वर एक खेल हैं
सारी दुनिया बंद हैं जिसमे
ईश्वर ऐसी जेल हैं



Tuesday, 13 August 2013

|| श्री स्वामी समर्थ - आरती ||



मूळ वडाचे कूळ सांगोनी जगता उद्धारी ||
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||धृ||

कामक्रोधमदमत्सरमाया बसलो कवटाळूनी
धूडकावूनी तुज नाम न घेई म्हणे मीच ज्ञानी
अज्ञानी मी पाप करी .. परी क्रोध न मजवर धरी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||

निर्मळ भक्ती मला जमेना कशी करू प्रार्थना
संसाराचा मोह सुटेना कशी करू अर्चना
भान हरपले भवसागरी तरी उचलुनी मजला धरी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||

सरस्वतीची वीणा मंजुळ कवन तुझेच करी
स्वामी समर्था तुझ्या पाऊली लक्ष्मी येई घरी
गौरी हर हर हरण करी मम दुःखाचे झडकरी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||

गौरीनंदन गण गण गणपती मोहक नृत्य करी
डम डम घण घण शंखनाद जणू अनंत वाजे ऊरी
उदे उदे जगदंबा माते हृदयी वास करी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||




Sunday, 28 July 2013

Genius - Ketan C. Sheth - part 2

केतन भाई माझ्यासाठी कायमचे genius no.1 बनले याला आणखीन बरीच कारणे आहेत. केतन भाईंच्या अनेक कथा मनात फेर धरून आहेत. त्या साऱ्या इथे सांगणे शक्य नाही. पण वानगीदाखल आणखी दोन उदाहरणे सांगितल्याशिवाय राहवत नाही.

शेअर मार्केट मध्ये खरेदीच्या टिप्स देणारे भरपूर लोक होते, आजही आहेत. पण घेतलेले शेअर कधी विकावे याचे अभ्यासपूर्वक अचूक आडाखे/ अंदाज  बांधणारे मला फार क़्वचितच आढळले. जास्तीत जास्त लोक वाट बघत बसतात. भाव वर जातात आणि खाली येतात. लोक पुन्हा भाव वर जातील म्हणून वाट पाहत राहतात. कधी भाव वर खाली होत राहतो आणि एक दिवस खाली येतो तो वर जात नाही.

पण केतन भाई मात्र विक्रीची वेळ अचूक साधत. रु.२५ किमतीला खरेदी केलेला शेअर रु.४५-४६ झालेला असे. मार्केट मध्ये बातमी असे कि भाव रु.५० ओलांडून जाणार. ६०-७०-७५ आकडे ऐकू येत. केतन भाई मात्र शांतपणे ४३-४४ पासून शेअर विकायला सुरुवात करीत. ४६-४७ पर्यंत सर्व शेअर विकून मोकळे होत  आणि अभ्यासपूर्वक शोधलेल्या दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीकडे वळत. विचारले कि सांगत "भाव वरती जाणार असेल तर जाऊ दे. पण माझ्या अभ्यासाप्रमाणे शेअर overpriced झाला आहे." आणि गम्मत म्हणजे भाव ४७-४८ किंवा फार तर ५० पर्यंत जाऊन खाली कोसळत असे. लोक मग तो शेअर खाली येताना केतन भाईंनी  विकला त्यापेक्षा खालच्या भावात विकत असत. असा अभ्यासू माणूस मला तरी नंतर एखाद दुसराच आढळला.

केतन भाईंच्या दूरदृष्टीचा मला आणखी एक अनुभव आला. १९९४ ची गोष्ट आहे. तेंव्हा Mutual Funds भारतात आपले पाय रुजवू पाहत होते. एक दिवस मी त्यांना Mutual Funds बद्दल बोलताना ऐकले. ते सांगत होते कि सर्वसामान्य माणसांनी आता Mutual Funds कडे वळायला हवे. हे उद्याचे मार्केट आहे. छोट्या गुंतवणूकदारांसाठी हा एक छान उपयुक्त पर्याय असून त्यांनी शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्यापेक्षा १५-२० वर्षांचा काळ नजरेसमोर ठेवून Mutual Funds मध्ये नियमितपणे पैसे गुंतवले पाहिजेत. शेअर बाजार येत्या १०-१२ वर्षात हलके हलके Indian Institutional आणि Foreign Institutional गुंतवणूकदारांच्या हातात जाणार आहे. पुढच्या १५ वर्षात शेअर बाजार खरोखरच institutional गुंतवणूकदारांच्या हातात गेलेला दिसून आला. छोट्या गुंतवणूकदारांना थेट गुंतवणुकीमध्ये तोटेच जास्त सहन करावे लागले किंवा घेतलेल्या शेअरशी  लग्न करून त्यांना घरात ठेवावे लागले. मात्र योग्य Mutual Funds मधील गुंतवणुका त्या मानाने बऱ्यापैकी सुरक्षित असल्याचे अभ्यास सांगतो. माझ्या Genius च्या यादीतील आणखीन एक व्यक्ती श्री. जुझर गाबजीवाला हे देखील Mutual Funds मधील नियमित गुंतवणुकीला प्राधान्य देताना मला आढळले. थोड्या फार फरकाने त्यांचे म्हणणे देखील केतन भाईंप्रमाणच आहे.  

आजच्या परिस्थितीचे अचूक भाकीत करणारे अनेक असतील. पण २० वर्षांपूर्वी तसे कोणी केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. मी आजपर्यंत केतन भाईंसारखा दुसरा genius पाहिलेला नाही.  इतका अभ्यासू, अचूक निदान करणारा, भविष्याची अप्रतिम जाण असणारा आणि सर्वांकडून आदर मिळवून या साऱ्याचा कुठेही गर्व नसणारा असा माणूस माझ्या पाहण्यात तरी नंतर आला नाही. केतन भाई माझ्यासाठी तरी नेहमीच आदर्श नं. १ राहिले आहेत.

केतन भाई .... तुम्हाला मनःपूर्वक सलाम!

Sunday, 21 July 2013

गुरुपदी रमला






जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला

दैन्य, दुःख, दारिद्रय ... विळख्याने पिडला
कर्मफला भोगवटा ... कधी कुणा टळला?
जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला

रावा भीती लक्ष्मी क्षती ... रंक क्षुधे पिडला
भय हरण्या राव - रंके ...कधी कुणा स्मरला?
जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला

मदनबाण काम पीडे ... हृदयी व्याकुळला
कामक्रीडा ध्यास मनी ... कधी कुणा फळला?
जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला

मोक्ष मिळे ज्यास तया ... जन्म मृत्यू टळला
मोक्षाचा मार्ग कसा ... कधी कुणा कळला ?
जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला



Thursday, 18 July 2013

योद्धा - PREQUEL

शैली,

काल आणि आज, किती फरक पडला आहे. कालची हसतमुख मी आज गप्प असते. सदाफुली म्हणून ओळखली जाणारी मी कोमेजून चालले आहे. प्रत्येक जण विचारतो आहे, "काय झालं?" काय उत्तर द्यायचं तेच कळत नाही. काल सर्वांची दुःख माझी होती. मी त्यांच्या दुःखात सहभागी व्हायचे. त्यांना हसवायचे आणि मीही हसायचे. मला वैयक्तिक दुःखे होती. पण ती कधी मी मोठी मानली नाहीत. मग आज असं काय आभाळ कोसळलं?

खूप विचार केला आणि छोटेसे सत्य लक्षात आले. काल मी सुखाची चव चाखली नव्हती. मी विसरले होते कि सुख नावाचे काही अस्तित्वात असते. वेदना सहन करीत जगणे अंगवळणी पडले होते. त्यामुळे इतरांच्या वेदना मी समर्थपणे समजू शकत होते, हाताळू शकत होते. त्यात सहभागी होऊ शकत होते. मग माझ्या आयुष्यात तू आलास. मी तुझ्या प्रेमात पडले रे! आणि माझ्या लक्षात आलं कि तुही माझ्यावर प्रेम करतोस. खूप आनंद झाला. आपले असे हक्काचे कोणी आहे याची जाणीव झाली. सुख म्हणजे नेमकं काय याची चव चाखायला मिळाली. 

पण तुझ्या तोंडून कधी माझ्यावरील प्रेमाचा उच्चार झाला नाही. माझे कान आणि मन, दोन्ही तुझ्या तोंडून ते शब्द कधी येतात याची आतुरतेने वात पाहत होते. शेवटी मलाच प्रेमाचा उच्चार करावा लागला. आणि तेंव्हाच मला कळले कि तू खरच माझ्यावर प्रेम करत आहेस. पण प्रेमाचा उच्चार का करायचा हे तुझ्या लक्षात येत नव्हते. एखाद्यावर प्रेम करत असाल तर ते तुमच्या शब्दातून व कृतीतून प्रकट करायला हवे.  अरे, अप्रकट प्रेम हे समोरच्याला संभ्रमात पाडू शकते. 

आपल्याकडे  प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द किंवा स्पर्श हेच दोन उपाय असतात. बाकी भेटी देण्यासारखे सारे उपचार, ज्यांना एकमेकांमध्ये प्रेम नाही ... फक्त स्वार्थ आहे, असे लोकदेखील अमलात आणतात. मग त्यांच्यातल्या आणि आपल्यातल्या फरकाला ठळकपणे दाखविणाऱ्या याच दोन गोष्टी आहेत.

आज मात्र मला फार वाईट वाटत आहे. काल मी सुखी नव्हते. त्यामुळे इतरांच्या सुखाला आपलं मानत होते. त्यातच समाधान मानत होते. आज मात्र मला अचानक सुख हाती लागलं आहे. आणि आता ते हरवत चालले आहे कि काय, अशी शंका मनात येऊ लागली आहे. मन त्या भयाने दाटून चालले आहे. हे गवसलेले सुख गेले तर ती वेदना पचविणे मला जमणार नाही म्हणूनच मी कोमेजून चालले आहे.

मला अशी शंका वाटते कारण _ तुझा अबोला _ मला असह्य होतो आहे. विचारलेल्या प्रश्नाचं जेव्हढ्यास तेव्हढे उत्तर देणे, आपणहून न बोलणे, न भेटणे .... साधी फोनवरून विचारपूस करायला देखील तुला सवड नाही? हे सारे मला असह्य होते आहे. याची मला सवय नव्हती. अरे तुझ्या गोड आवाजाची मला इतकी सवय लावलीस आणि आज अचानक बोलेनासा झालास. माझं काही चुकलं का? कि मी नकोशी झालेय? तू बोलल्याशिवाय मी काही समजूच शकत नाही. तू दूर जाण्याच्या कल्पनेनेदेखील माझा जीव कासावीस होतो. सारे विचारतात, "काय झालं? तू इतकी गप्प का झालीस?" मी काय सांगणार  त्यांना _! आज मी माझ्या आयुष्यात स्वतःला कोलमडताना पाहते आहे.  तुझ्याकडे आधारासाठी पाहिलं तर तू त्रयस्थासारखा वागतो आहेस. अशाने मी अधिकाधिक खचते आहे. 

तुझ्या वागण्याने मी क्षणाक्षणाला कणाकणाने खचत चालले आहे. असं कणाकणाने झिजण्यापेक्षा एखादा मोठा घाव घालून मला तोडलंस तर ते सहन करणं मला जास्त आवडेल. मला असे घाव जिव्हारी झेलण्याची सवय आहे. पण असं जीव लावून मग समोरच्याला रडविणे चांगले नाही. तुला काय हवाय ते निश्चित कर आणि ते स्पष्टपणे मला सांग. 

Hope you will understand me as always. 

तुझी,
मना

Friday, 12 July 2013

हक्क

असाच एक दिवस __

त्या दिवशी गाडीत शिरल्यावर धक्काबुक्की करून मी जागा पकडली आणि जरा निवांत बसल्यावर आलेले विचार ....


आज मला अत्यंत गरज होती ती या जागेची _ खूप दमलो होतो. ही जागा मिळवण्यासाठी मी कोणत्याही ठरला जाऊ शकतो, हे आजूबाजूला पाहिल्यावर माझ्या लक्षात आले आहे. पण आता उशीर झालाय. मी धडपड करून, धक्काबुक्की करून ही जागा ताब्यात घेतली तेंव्हा मी इतर कोणाचा हक्क हिरावून घेत असेन असा विचार मला स्पर्श देखील करू शकला नाही. रांगेत माझ्यापुढे असणारे अजून उभे आहेत आणि मी आरामात बसलो आहे. मी दमलो होतो ... सत्य आहे. पण या रांगेत माझ्यापेक्षा जास्त दमलेला कोणी असू शकेल हे माझ्या का लक्षात आले नाही? जर असा कुणी असेल तर त्याच्या हक्कांपासून मी त्याला वंचित ठेवले आहे हे निश्चित आहे.

एखाद्या आत्यंतिक गरजेपोटी आपण इतरांचा हक्क हिरावून घेतो. त्यांच्या गरजा जाणून घेणे तर दूरच, पण तसा विचार देखील मनाला स्पर्शून जात नाही. त्या क्षणाला आपली सारासार विचारशक्ती क्षीण झालेली असते; विवेक संपलेला असतो; सद्सद्विवेक बुद्धी लोप पावलेली असते. इतरांचा हक्क हिरावून आपण तणाव मुक्त होतो. पण नंतर आपली प्रतिक्रिया काय असते?

आपल्यातले काही इतरांच्या गरजेचा विचार करतात आणि त्यांच्याबरोबर जागा (हक्क) विभागून घेतात. पण अशा रीतीने वाटणी करताना इतरांवर उपकार करत असल्याचा अविर्भाव त्यांच्या वागण्यात प्रकट होतो. जेंव्हा तुम्ही मिळवल तेंव्हा तो तुमचा हक्क म्हणून स्वीकारलेत ना? मग इतरांकडे हस्तांतरित करताना मात्र दात्याच्या भूमिकेत शिरता? हे योग्य आहे?

काहींना तर इतरांच्या गरजांचा विचार करण्याची देखील आवश्यकता वाटत नाही.  ते स्वतःच्या आरामदायी अवस्थेवर इतके फिदा असतात कि इतरेजन त्यांना तुच्छ वाटतात. 

एकदम पहिल्या वेळी मन सावध असते. ते तुम्हाला जाणीव करून देते _ इतरांच्या हक्कांची! पण मनाकडे दुर्लक्ष केले जाते. आरामदायी अवस्थेवर लक्ष केंद्रित केले जाते. हलके हलके मनाची ही जाणीव / टोचणी देखील क्षीण होत जाते. इतरांचा हक्क हिसकावताना मन आपल्याला सावध करत नाही. डार्विनचा सिद्धांत आहे _ ज्या अवयवाचा वापर केला जात नाही तो गळून जातो; नष्ट होतो. मनाचा तो सावध करणारा विशिष्ट कप्पा बंद होतो _ कायमचा! आणि मग असे हिसाकावणे म्हणजे स्वतःचा हक्क कमावणे वाटू लागते. 

आज सर्वत्र अशीच परिस्थिती बनत चालली आहे. 
ज्या क्षणाला तुम्ही relax होता त्याच क्षणाला विचार करा. 
आजूबाजूला एखादा गरजू असू शकेल. 
त्यालाही नितांत गरज असेल. 
त्याची निकड समजून घ्या. 
त्याला शोधा _त्याला ओळखा _ आणि त्याचा हक्क त्याला द्या.


Wednesday, 10 July 2013

Dedicated to MOTHERS

बुधवार दि. २२-०५-२०१३
२४-०५-२०१३ माझ्या आईचा ७५वा वाढदिवस _ त्याचा छोटासा घरगुती कार्यक्रम रविवार, दि. २६ रोजी करण्याचे योजिले होते. त्या तयारीत असतानाच संध्याकाळी whats app वर बातमी  वाचली. माझी वर्गमैत्रीण सुवर्णा देशमुखची आई वारली.  सुवर्णाच्या आईला भेटायचे राहून गेले. आईच्या आजारपणात सुवर्णाला धीर देण्यासाठी देखील भेटू शकलो नाही.

शनिवार दि. २५-०५-२०१३
गेले २ दिवस माझे विचार आमच्या दोघांच्या आयांभोवातीच घोटाळत होते. आज सकाळी ट्रेनमध्ये एकामागोमाग ओळी सुचत गेल्या. ट्रेनमध्ये एका सुरेख कवितेने आकार घेतला. पण ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत स्मरणशक्तीने दगा दिला. त्यातले आठवले तेव्हढे लिहून काढले. आता तुमच्यासमोर तेच पेश करतोय.


                        आई


चालता चालता तीन शब्द ... पडले माझ्या कानी
गोठून गेलो उत्तर ऐकून ... डोळा आले पाणी
पुसत होता कोणी कोणा ... "कशी असते आई"
पुसणाऱ्याला सांगत होती ... कुणी एक बाई

नवजात शिशुसाठी ... गाते अंगाई
शी काढा .. शु पुसा .. आई बनते दाई
बालपणी माई ... तशी कुमारपणी ताई
तरुणपणी शिंगे फुटताच ..... आई वाटते बाई
लहानपणी गोष्टी आणि बालपणी मस्ती
मुले तरुण होतात तेंव्हा .... आई एकटीच द्रष्टी

आई असते घरी तरी नजर खिळली दारी
सुखरूप यावी मुले ... हीच काळजी उरी
भरलेल्या घरात ... कोणी राहते का उपाशी
मुले अजून जेवली नाहीत ... आई वेडीपिशी
सारी सृष्टी मुलांमध्ये ... दृष्टी तिची अटळ
नजरेमधून ओघळ होतात ... जगामधले बदल

दिवस सरतात भराभरा ... मुले होतात मोठी
डोंगराएव्हढी माया तेंव्हा दिसू लागते छोटी
आभाळाची माया सोडून झेप घेतात नभी
परत येईल पाखरू म्हणून आई दारात उभी
दूरदेशी पाखरू ... इथे आई दुःखी कष्टी
कढत अश्रू डोळ्याआड ... शीतल राखी दृष्टी

शेवटी ती म्हणाली ... "एकच तुला सांगते"
"आई जाणण्यासाठी ... पहिले आई व्हावे लागते"
खळकन खळले पाणी ... कसे सांगू बाई 
मनात म्हटले "चुकलीस... आधी गमवावी लागते आई"





Tuesday, 9 July 2013

गुरुदत्तचे चित्रपट - एक योगायोग


गुरुदत्तच्या चित्रपटात तीन वेळा त्याच्या चित्रपटाची सहनायिका (किंवा Vamp)  त्याच्या पुढच्या चित्रपटाची नायिका बनली. 

१९५१ साली गुरुदत्तने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट _ बाझी! यात नायक होता देव आनंद आणि कल्पना कार्तिक नायिका ... पण बाझी चे नाव काढले की कल्पना कार्तिक आठवते का हो?   "तदबीर से बिगडी हुई तक़दिर बना ले" म्हणत डोलणारी आणि ते खास शब्द "ए हेयsss  हे हेय sss" ... गीता बाली झटकन समोर येते. 

गुरुदत्तने दिग्दर्शित केलेला पुढचाच चित्रपट "जाल" _ साल १९५२ _ नायक परत त्याचा परममित्र देव आनंद आणि आता नायिका गीता बाली! "चोरी चोरी मेरी गली आना हैं बुरा" ,"ये रात ये चांदनी फिर कहा "  , " दे भी चुके हम दिल नजराना" अशी सुरेल गाणी तिच्या वाट्याला आली होती. 

१९५४ मध्ये निर्माता आणि दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेत शिरून त्याने पहिला चित्रपट काढला _ "आर पार" .... नायक पण तो स्वतःच होता तर नायिका होती श्यामा . "ये लो मैं हारी पिया", "कभी आर कभी पार", "सुन सुन सुन सुन जालीमा" अशी एक से बढकर एक गाणी तिच्या तोंडी होती. पण भाव खाऊन गेली ती क्लब डान्सर शकीला _ चणे तोंडात टाकत उभा असलेला गुरुदत्त .. आणि त्याच्यासमोर क्लबमध्ये  बसलेल्यांना मदहोश नजरेने घायाळ करत सळसळत नाचणारी शकीला _ "बाबुजी धीरे चलना प्यार में sss ".  दुसऱ्या कडव्यानंतर "बडे धोके हैं ... बडे धोके हैं इस राह में" हें गाताना गुरुदत्तकडे तिने टाकलेला खुनशी कटाक्ष आणि नजर ..लाजवाब ! परिणाम ???  १९५६ _ निर्माता गुरुदत्त _ चित्रपट  सी आय डी _  नायक देव आनंद आणि नायिका?? ...... शकीला !

१९५६ साली आलेला "सी आय डी" हा एक मैलाचा दगड _ अप्रतिम गाणी, अप्रतिम छायाचित्रण, सुंदर रहस्यकथा _ पण इथेही योगायोग पहा. नायिका शकीलावर चित्रित केलेली "लेके पहला पहला प्यार", "बुझ मेरा क्या नाम रे" ही सर्वांगसुंदर गाणी मात्र तिच्या तोंडी नाहीत. आशा भोसलेंच्या आवाजामधले  थोडेसे उदासवाणे "लेके पहला पहला प्यार" आणि  "आंखो ही आंखो में" हें देव आनंद बरोबरचे अशी दोनच गाणी शकीलाच्या वाट्याला आलीत.

शकीलाबरोबर यात सहनायिका वहिदा रेहमान होती. थोडीशी खलनायकी छटा असलेली भूमिका तिच्या वाट्याला आली होती. आणि गाणी म्हणाल तर क्या बात हैं _ "जाता कहा हैं दिवाने" आणि "कही पे निगाहे कही पे निशाना" ... दोन्ही भावखाऊ गाणी _ आणि वहिदाची अप्रतिम अदाकारी! परिणाम पुन्हा तोच _ 

पुढचे चित्रपट _ प्यासा", "कागज के फुल"  _ निर्माता + दिग्दर्शक + नायक गुरुदत्त _ नायिका  ???वहिदा रेहमान _ आणि पुढे "चौदहवी का चांद", "साहब, बीबी और गुलाम" मध्ये गुरुदत्त - वहिदा जोडी कायम राहिली. 



Sunday, 7 July 2013

गाणे : चांगले आणि वाईट - १


मी गाणे कसे ऐकतो?


अनेक जण गातात. कुणाचे गाणे लोकांना आवडते तर कुणाचे आवडत नाही. पण एखाद्याचे गाणे आवडले म्हणजे ते चांगले आणि नाही आवडले तर खराब असे असते का? चांगले आणि वाईट गाणे कशाला म्हणावे? हे कसे ठरवले जाते? असे चांगले वाईट ठरवणाऱ्या लोकांना गाण्यातले खरेच कळते का?

बहुतेक लोक स्वतःला सामान्य समजतात आणि साधारणतः एक प्रश्न विचारतात चांगले गाणे कसे ओळखायचे. कठीण प्रश्न आहे नाही? मला नाही असे वाटत. उलट उत्तर एकदम सोपे आहे. त्यासाठी भरपूर आणि विविध प्रकारचे गाणे ऐकत राहा. एखादे किंवा एखाद्याचे गाणे आवडले म्हणून परत परत तेच ऐकत राहिलात तर तुम्ही त्यातच अडकाल. तुम्हाला त्या गाण्यातले नेमके काय आवडले ते शोधा. त्यातली एखादी जागा, तान, चाल, लय, शब्द नेमके काय भावले?आणि मग ते पकडून इतर गाणी ऐका. 

सर्वसाधारण असे म्हटले जाते कि जास्तीत  जास्त वाईट ऐकलेत कि आपोआप चांगले काय ते कळू लागते. पण असे नाही. जास्तीत जास्त गाणे ऐका. चांगले वाईट ठरवू नका. ऐकता ऐकता आपोआप समजू लागते _ सामान्य काय _ चांगले काय _ वाईट काय! 

प्रथम सामान्य गायन किंवा गाणे म्हणजे काय ते समजून घ्या आणि मग गाणे ऐका. जे ऐकले ते सामान्यतः कसे असते एखाद्या माहितगाराकडून  समजून घ्या आणि जे ऐकलेत ते त्याच्याशी ताडून पहा. 

आपण सामान्य गायन याप्रकाराचे एक उदाहरण पाहू. सारी गायकी सहसा बाराखडीमधील  "अ, आ, इ, ई, उ, ओ ..." अशा स्वरांवर, उच्चारांवर आधारित आहे. वानगी दाखल आपण "आ" चा उच्चार पाहू. 

बहुसंख्य सामान्य गायक तोंड पूर्ण उघडत नाहीत. त्यामुळे "आ" चा उच्चार कित्येकदा "अ"शी (ओठ अपुरे उघडल्यास) किंवा "ऑ" शी (ओठांचा चंबू केल्यास)  मिळताजुळता होतो. परिणामी घेतलेला आलाप हा "मितवा ssssss" असा न येता "मितवअ ssssss"किंवा  "मितवॉ ssssss" असा येतो. 

काही गायक तर अनुनासिक गातात. त्यांचा "आ" चा उच्चार  हा "आं" असा होत असतो. आणि मग तान देखील जाते ती "आं sssss" या अंगानेच _!

कधी तरी ऐकायला बरे वाटले तरी "मितवा ssssss" चा आपल्यावर होणारा परिणाम हा "मितवअ ssssss" , "मितवॉ ssssss" किंवा  "मितवां ssssss" याने साधला जात नाही. मनाला काही तरी राहून गेल्याचे सतत जाणवते. चांगल्या गायकाचे वैशिष्ट्य असते कि तो शब्दांचा उच्चार समजून घेतो, स्पष्ट शब्दात गातो आणि ते लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतो.

स्पष्ट उच्चार आणि ठळकपणे  मांडलेले आकार_उकार_इकार हे चांगल्या गाण्याचे एक लक्षण आहे.

उदाहरण द्यायचे तर पंडीत कुमार गंधर्वांचे "अजुनी रुसुनी आहे"  हे गाणे ऐका. त्यातला "रुसुनी" चा उच्चार पहा. "खुलता कळी खुले ना" यात "ना" नंतरचा आलाप किंवा "पाकळी हलेना" यात "पा" नंतरचा थरथराट ऐका. गाण्यात वर सांगितलेल्या "अ, आ, इ, ई, उ, ओ" या स्वरांशी ते कसे खेळले आहेत ते अनुभवून पहा. 
किंवा 
पंडीत कुमार गंधर्वांचेच आणखीन एक "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी"  हे गाणे ऐका. या गाण्यातले "आssssssss" हे आलाप ऐका.  मग "आ" चा उच्चार कळेल आणि चांगले गाणेही आपोआप कळेल.



Friday, 5 July 2013

Genius - Ketan C. Sheth - part 1



१९९० पासून मी शेअर बाजारात आहे. तीन वेगवेगळ्या नोकऱ्या झाल्या. या तीनही ठिकाणी काम करताना पुष्कळ माणसे आयुष्यात आली. चांगली-वाईट, प्रामाणिक- फसवे _ पण ज्या माणसांनी मला प्रभावित केले अशी फक्त चार माणसे.

     श्री. केतन शेठ
     श्री. अर्जन गुरुबक्षांनी
     श्री. भरत गाला
     श्री. जुझर गाबाजीवाला 

या माणसांबरोबर काम करायची संधी मिळाली आणि बरेच काही अनुभवायला मिळाले. या सर्वांची प्रभुत्व निरनिराळ्या क्षेत्रात, काम करायची शैली भिन्न _ पण हे सारे मला जिनियस वाटतात. म्हणूनच आज त्यांच्याबद्दल थोडेसे ......

श्री. केतन शेठ

मला आजही पहिली भेट आठवतेय. मी नोकरीच्या शोधत होतो. राममामाचा  मित्र, चंद्रेश गरोडिया याच्या ओळखीने शेअर मार्केटच्या अवाढव्य इमारतीत (१९९० साली इतक्या मोठ्या इमारती मोजक्याच होत्या) रूम ८०१ मध्ये जेमतेम ७ x ५ च्या ऑफिसमध्ये बसलेले केतनभाई .. चन्द्रेशकडून आलाय कळल्यावर कसलीही मुलाखत न घेता "कल से आ जाओ" इतकेच बोलून वर्तमानपत्र वाचनात मग्न झाले. तेंव्हा मला जाणवले नव्हते की आपण कोणासमोर उभे आहोत. हजारो दलालांपैकी एक इतकीच माफक प्रतिक्रिया माझी होती. 

तेंव्हा केतनभाई, अनिल मिठालाल (हे एक मिठ्ठास  व्यक्तिमत्व, इतका गोड स्वभावाचा आणि तलम हृदयाचा दलाल मी अजून तरी पहिला नाही) या शेअर दलालाची institutional division सांभाळत होते. SBI, UTI, LIC, BOI CBI अशा त्या काळातल्या सर्व मोठ्या institutes मधून सौदे होत होते. त्या institutes मध्ये सौद्याची contract notes द्यायला जायचो तेंव्हा केतनभाईकडून आलोय समजल्यावर जी वर्तणूक मिळायची ती पाहता कुणातरी मोठ्या माणसाकडे नोकरी करतोय के समजायला लागले. कधी कधी Fund Managers आणि त्यांचे वरिष्ठ आपल्या केबिनबाहेर येऊन  केतन भाईंची आवर्जून चौकशी करायचे. नंतर केतन भाईबद्दल जसे जसे इतरांकडून ऐकत गेलो तसे त्यांच्याबद्दल आदर वाढतच गेला. 

केतन भाई स्वतः research analysist होते. ते Enam Securities या शेअर मार्केटमधील एका प्रसिद्ध कंपनीच्या research wing शी जोडलेले होते. अनिल मिठालाल यांचे  clients  तर केतन भाई कोणता शेअर घेतात आणि विकतात ते सांगण्यासाठी आम्हाला पैसे द्यायला तयार होते. काही जणांनी तर मला केतन भाई Institutes ना कोणती कंपनी सुचवतात ते सांग आणि त्याबद्दल तुला काय हवे ते माग इथपर्यंत लालूच दाखवली. 

तेंव्हा मार्केटचे सौदे ring मध्ये होत. प्रत्येक दलालाच्या ऑफिसमध्ये एका speaker वर सौद्यांची commentary चालू असे. केतन भाई फोनवर बोलताना लोक चालूगिरी करत. भिंतीवरच्या speaker वरचे सौदे ऐकण्याच्या बहाण्याने ते केतन भाईच्या केबिनजवळ जात आणि केतन भाई फोनवर काय बोलतात ते ऐकायचा प्रयत्न करीत. एखाद्या कंपनीचे नाव जरी कानावर पडले तर लोक स्वतःला धन्य समजत असत. 

लोकांचे जाऊ द्या, पण केतन भाई ना मी genius का  म्हणतो याचा एक किस्सा सांगतो. आजही मला एक प्रसंग आठवतोय. मार्केट सुरु व्हायचे होते. मी त्यांच्या केबिनमध्ये त्यांच्यासमोरच बसलो होतो. केतन भाई वर्तमानपत्र वाचत बसले होते. मधले कुठले तरी पान वाचताना अचानक त्यांनी वर्तमान पत्र खाली ठेवले. घाईघाईत फोन उचलला आणि ring मध्ये सौदे करायला जाणाऱ्या माणसाला त्यांनी कोणते तरी शेअर विकायला सांगितले आणि समोर दुसरे कोणते तरी शेअर घ्यायला सांगितले. (बहुदा कोणत्या तरी रंगांच्या कंपन्या होत्या) परत वर्तमानपत्र उचलून वाचन सुरु. पाच दहा मिनिटात मार्केट सुरु झाले. मार्केट सुरु होऊन साधारण दोन तासांनी विकलेल्या शेअरचा भाव अचानक झर्रकन खाली गेला आणि घेतलेल्या शेअरचा वर जाऊ लागला. जाssssदूsssss ? 

मार्केट संपल्यावर मी त्यांना विचारले की त्यांनी ते सौदे कशावरून ओळखले. त्यांनी मला वर्तमानपत्रामधली कुठल्या तरी आतल्या पानावरची एक बातमी दाखवली. त्यात गुजरातमध्ये एका कंपनीच्या गोदामाला आग लागून माल जाळून खाक झाल्याची एक फार तर चार ओळींची बातमी होती. ही वार्ता आणि त्याचे विश्लेषण मार्केट मध्ये पसरायला दोन तासापेक्षा जास्त वेळ जावा लागला. तिथे इतकी छोटी बातमी अचूक टिपणारे आणि एका क्षणात तिचे विश्लेषण करणारे केतन भाई माझ्यासाठी कायमचे genius no.1 बनले.


क्रमशः

Thursday, 4 July 2013

तुमको देखा तो ये खयाल आया



गझलची खासियत ही आहे की त्यात एकाच अक्षराचे उच्चार कधी तोंडाच्या पुढच्या भागातून तर कधी घशातून केले जातात. तसेच अक्षरांमधल्या आणि शब्दांमधल्या जागा कशा घेतल्या जातात यावरही ती गझल मनाला भावणे अवलंबून असते.

"  तुमको देखा तो ये खयाल आया "   ही जगजीत सिंग यांची एक सोपी आणि सरळ वाटणारी (?) गाजलेली गझल. मला त्यात काय गमले ते मी इथे सांगायचा प्रयत्न करतोय. प्रयत्न अशासाठी की गझल वेगवेगळ्या मैफिलीत पुन्हा पुन्हा ऐकताना, तिच्यामधल्या अनेक नवीन जागा जाणवत राहतात. पण मी फक्त मूळ गाण्याबद्दल लिहिणार आहे.

जगजीत आणि चित्राच्या हुंकारांनी गाण्याची सुरुवात होते. सुरुवातीलाच चित्राने जी तान घेतली आहे ... जवाब नाही! त्यानंतरचे तिचे .... हुं हुं हुं .. हुं हुं ..एखाद्या किनऱ्या घंटेसारखे कानामध्ये गुंजन करते. किती वेळा rewind करून ते ऐकले असेल गणतीच नाही. आणि तिचा आवाज ऐकून आता यानंतर जगजीत यापेक्षा चांगली काही करामात दाखवू शकेल असे वाटले नाही. पण जसे जसे गाणे पुढे सरकू लागते तसे .... एक एक लाजवाब क्षण कानात रुंजू लागतात. संपूर्ण गीत एका मुलायम स्वरात गाताना काही शब्द आणि अक्षरे ठळक उच्चारून मस्त परिणाम साधलाय. जितके गुण जगजीत सिंग यांना तितकेच संगीतकार कुलदीप सिंग यांनादेखील दिले पाहिजेत.


तुमको देखा तो ये खयाल आया
जिंदगी धूप तुम घना साया

सुरुवातीलाच देखा चा "खा" इतका मस्त घेतलाय आणि खयाल शब्दाचा उच्चार करताना "ख" आणि "याल" मध्ये जी त्याने जी जागा घेतली आहे ती अप्रतिम . . "देखा" आणि "खयाल" हे दोन्ही शब्द जवळजवळ एकामागोमाग येतात. पण देखा मधील ख ठळक (तोंडातून) उच्चारून आणि खयाल मधला ख (घशाजवळून) एखाद्या पिसासारखा अलगद सोडून दिलाय. "साया" शब्दाचा उच्चार इतका मुलायम झालाय की जणू दुधावरची सायच !


आज फिर दिलने इक तमन्ना की
आज फिर दिलको हमने समझाया

"आज फिर" हे शब्द दोन्ही ओळीत आहेत. पहिल्या ओळीत वरच्या आणि दुसऱ्या ओळीत खालच्या सुरात हे शब्द आलेत. ऐकताना एकदम सहज म्हटल्यासारखे वाटतात. पण "फिर" चा उच्चार करताना र असा सोडलाय की ती जागा पकडणे अशक्यप्राय वाटते. दोनी ओळीत दिल हादेखील common शब्द आहे. पण दोन्ही वेळी "ल" चा उच्चार वेगळा केलाय. पहिला "ल" सहज सोडलाय तर दुसरा "ल" काळजात ठककन ठोका देऊन जातो. समझाया मध्ये "झा" वर केलेला आघात देखील हृदयात घुसतो.


तुम चले जाओगे तो सोचेंगे
हमने क्या खोया हमने क्या पाया

गाण्यात पहिली ओळ दोनदा आहे ती वेगवेगळ्या सुरावटीत .... पहिलि ओळ ऐकताना एक प्रकारचा बेफिकीरपणा वाटतो. तर दुसरी ओळ काळजाला सर्र्र्कन स्पर्शून जाते. दोन्ही ओळी या मुळातच वेगवेगळ्या लयीत असल्या तरी हा फरक "तो सोचेंगे" या दोन शब्दांच्या उच्चारावेळी "तो" आणि "सो" यात दुसऱ्या वेळी जो किंचित जास्त वेळ दिलाय त्याने आलाय.

"हमने क्या खोया हमने क्या पाया" ही तर एकदम झकास ओळ आहे. दोन वेळा येणारा हमने हा शब्द ... त्यातला "ह" कसा उच्चारालय ते खास अनुभवायची गोष्ट आहे. पहिला हमने तोंडातून आणि दुसरा घशातून तसेच ते अलगद सोडून दिलेले "खोया" आणि "पाया" शब्द ...


हम जिसे गुनगुना नही सकते
वक़्तने ऐसा गीत क्यू गाया

इथेही "हम" चा (खास करून "ह" ऐका) उच्चार एकदम गंभीर करून जातो आणि पुढच्या वाक्याची तयारी करून जातो. "जिसे" शब्द दुसऱ्यांदा उच्चारताना घेतलेली फिरकी तर "क्या बात है"!  "सकते" शब्दाचा उच्चार करताना "स" आणि "क" चा उच्चार तर ऐकणेबल आहे. "वक़्तने ऐसा" पर्यंत एकदम मुलायम असणारा स्वर .... गीत मधल्या "गी" वर आघात देऊन मस्त परिणाम साधलाय.

मित्रांनो मी यातल्या काही जागाच लिहिल्यात पण तुम्हाला आणखी काही गमले असेल तर जरूर कळवा आणि हो .... तुम्हाला भावलेले एखादे दुसरे गाणे असेल तर जरूर लिहा.




Tuesday, 2 July 2013

जीहाल - ए - मिस्कीन ... मुकोन बेरंजीस

चित्रपट - गुलामी
गीतकार - गुलझार
संगीतकार - लक्ष्मीकांत प्यारेलाल
गाणे चित्रित आहे - मिथुन आणि अनिता राज

या गाण्याचा अर्थ मी अनेक वेब साईटवर पहिला पण गाण्याची अचूक शब्द रचना मला कुठेही दिसली नाही. म्हणून मी मला भावलेला अर्थ मांडत आहे. परिस्थिती अशी आहे की अनिता सारी नाती आणि गाव सोडून मिथुन बरोबर निघालीय. त्यामुळे दुःखी आहे. मिथुन खुशमिजाझ व्यक्तिमत्व .. पण तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे. सतत तिला खुश ठेवायचा प्रयत्न करतोय. तो तिच्याशी किती एकरूप झालेला आहे या त्याच्या एकतर्फी प्रेमाची कहाणी हे गाणे सांगते. गाण्याची सुरुवात पर्शिअन कवी अमीर खुस्रो याच्या ओळीने झालीय.

जीहाल - ए - मिस्कीन ... मुकोन बेरंजीस
बेहाल - ए - हीज्रा ... बेचारा दिल हैं

मी उर्दू किंवा पर्शिअन मधला जाणकार नाही. पण या भाषा समजणाऱ्या कोणी कोणी मला जे अर्थ सांगितले ते असे आहेत.

जीहाल = जहाल/ तीव्र/ खूप/ टोकाचा/ अत्यंत 
मिस्कीन = गरीब 
(याचा गाण्यातला उच्चार मिस्की किंवा मस्ती असा आहे)
मुकोन = करू नकोस
बेरंजीस = खेचाखेच/ द्वंद्व/ ओढाताण 
बेहाल = न घरका ना घाटका 
(अमीर खुस्रोच्या  मूळ गझलमध्ये "बा हाल" असा शब्द आहे. यात "बा" याचा अर्थ मराठीतल्या "चुकूनमाकून" शी मिळता जुळता आहे. "बा हाल" = चुकूनमाकून सध्याची स्थिती असा अर्थ होतो. मी इथे उच्चाराप्रमाणे शब्द घेतला कारण मला तो अर्थ भावला.)
हिज्रा - ना नर ना नारी असा मधला 
(गाण्यातला उच्चार हिज्रा असला तरी अमीर खुस्रोच्या मूळ गझलमध्ये हा शब्द "हिज्र" = विरह, वियोग या अर्थाने आला आहे. मी इथे उच्चाराप्रमाणे शब्द घेतला कारण मला तो अर्थ भावला.)

हे सारे याचे शब्दार्थ झाले. प्रश्न असा आहे हि भावार्थ काय? उर्दूमध्ये शेर बरेचदा फिरवून लिहिले जातात. मी हे उलटे फिरवून  वाचले आणि मला असे वाटले की मला अर्थ गवसला.

बेचारा दिल हैं  ... बेहाल - ए - हीज्रा ...  जीहाल - ए - मिस्कीन ... मुकोन बेरंजीस

ज्याच्यापाशी काहीही नव्हते आणि कुणीही नाही (अत्यंत गरीब) असे माझे बिचारे हृदय ...एखाद्या गरीबाकडे काहीही नसल्याने जसे त्याला कोणीही विचारात नाही तसे हे माझे हृदय होते.  ते आता माझे राहिले नाही. तुझ्या हृदयाशी पूर्णपणे एकरूप झाले आहे. आणि तुझे लक्षच नाही आहे. तू तुझ्या दुःखात असल्याने तुझ्या हे लक्षात येत नाही आहे. धड न माझे न धड तुझे अशी त्याची हिजाड्यासारखी अवस्था झाली आहे. तो जसा पूर्ण पुरुष किंवा पूर्ण स्त्री नसतो तशी या हृदयाची अवस्था झाली आहे. तुझ्याशी एकरूप झाल्याने ते माझे असून माझे राहिले नाही आणि तू पूर्ण स्वीकार न केल्याने ते तुझे असून पूर्णपणे तुझेही झालेले नाही. स्वीकार अस्वीकार याच्यामध्ये त्याची ओढाताण होतेय. त्याची अशी खेचाखेच करू नकोस. त्याचा स्वीकार कर. पुढच्या ओळींचा विचार करताच लक्षात येते की हाच अर्थ सुसंगत आहे.

सुनाई देती हैं जिसकी धडकन
तुम्हारा दिल या हमारा दिल हैं

माझे हृदय तुझ्या हृदयाशी इतके एकरूप झालेय की मला जो आवाज ऐकू येतोय तो माझ्या हृदयाचा आहे की तुझ्या तेच समजेनासे झाले आहे. पुढच्या ओळींमध्ये याची आणखीन फोड करून सांगितली आहे.

वो आ के पहलुमे ऐसे बैठे
के शाम रंगीन हो गयी हैं
जरा जरासी खिली तबियत
जरासी गमगीन हो गयी हैं

तू माझ्या शेजारी बसल्याने हि संध्याकाळ खूप रंगीबेरंगी झाली आहे. माझे हृदय खूप आनंदित झाले आहे. पण जरी माझे हृदय तुझ्या हृदयाच्या सहवासात (एकरूपतेमुळे) आनंदाने फुलून आले असले तरीही तुझे हृदय दुःखी असल्याने माझे हृदय दुःखीही आहे. त्यामुळे माझे हृदय एकाच वेळी "खिली तबियत" आणि "गमगीन" असे दोन्ही अनुभव घेत आहे.

कभी कभी शाम ऐसे ढलती
के जैसे घुंघट उतर रहा हैं
तुम्हारे सीनेसे उठता धुंआ
हमारे दिलसे गुजर रहा हैं

हे कडवे म्हणजे एक सुरेख जमलेली भट्टी आहे. यात दोन रूपके आहेत "शाम" आणि "घुंगट" ... संध्याकाळ हि प्रेमीजनांची भेटण्याची वेळ असते तर त्यानंतर येणारी रात्र ही मिलनाची (घुंगट उठण्याची) रम्य घडी असते. घुंगट के पीछे काय आहे ते तो हटेपर्यंत गुलदस्त्यात असते. तसेच तुझ्या हृदयावरचा घुंगट हलकेच दूर होऊ लागलेला आहे आणि माझ्या तुझ्याशी एकरूप झालेल्या हृदयाला त्यात दडलेली वेदना समजते आहे. तुझे हृदय दुःखाने जळत आहे आणि माझे हृदय देखील त्या जळण्यात सामील आहे. म्हणूनच त्या आगीने निर्माण झालेला धूर माझ्या हृदयातूनच येत आहे.

ये शर्म हैं या हया हैं क्या हैं
नजर उठाते ही झुक गयी हैं
तुम्हारी पलकोसे गिर के शबनम
हमारी आंखोमे रुक गयी हैं

माझ्याकडे पाहिल्यावर तुझी नजर लगेच खाली वळतेय ती कशामुळे? ही तुझी झुकलेली  नजर तुझे  गुपीत  मला  सांगते  आहे  कि  तुला  माझी  भावना  कळली  आहे. तू लाजून (शर्म) खाली पाहत आहेस की माझ्या नजरेतल्या प्रेमळ भावाने तू अवघडली (हया) आहेस? की तू  तुझी  वेदना  लपवण्यासाठी  अवघडून नजर  खाली  करते  आहेस. वेडे मी तुझ्याशी इतका समरस झालोय ही आता हा देह सुद्धा तुझ्या देहाशी एकरूप झालाय. तुझ्या वेदनेचे अश्रुबिंदू मला पहाटेच्या दवबिंदुप्रमाणे भासतात. तुझ्या नजरेशी एकरूप झालेले माझे डोळे ते अश्रू तिथेच थोपवत आहेत. मला तुझ्या नजरेत अश्रू पाहणे शक्य नाही. तुझी वेदना मी संपवू इच्छितो. माझ्या प्रेमात झोकून दे आणि आनंदित राहा.



छकुलं



अले माझ छकुलं दुडूदु़डू धावलं ।।
पकडु मी गेले त्याला मला नाही गावलं ।। ध्रृ ।।

छकुल्याचे गाल .. गोरेगोरे पान ।।
पाणीदार डोळे .. टपोरे छान ।।
गालावर खळी कसं खुदकन हासलं ।।
पकडु मी गेले त्याला मला नाही गावलं ।। १ ।।

छकुल्याच्या फेट्यामधे मोरपीस खोवले ।।
सारे त्याच्या तालावर थुईथुई नाचले ।।
बोबड्याशा बोलावर सारं जग भाळलं ।।
पकडु मी गेले त्याला मला नाही गावलं ।। २ ।।

मुखात घालुन मुठी कशा चोखी ।।
छकुल्याच्या बाळलीला अशा कोटी कोटी ।।
मुठीमधे छकुल्याच्या सारं जग मावलं ।।
पकडु मी गेले त्याला मला नाही गावलं ।। ३ ।।




डाव मांडताना

पापणीत अलगद टिपले मुक्या भावनांना
काल तुला पाहिले मी … डाव मांडताना

ओंजळीत मोती बनला तुझा अट्टहास
ना कळले प्रीत ही बनली कधी माझा श्वास
पाहिलेस का तू मजला … श्वास कोंडताना
काल तुला पाहिले मी ......

अव्हेरिले मीच मला मी कोण दिशे जावे
परत पुन्हा मागे वळणे कुणा शक्य व्हावे
कालचक्र पिळते हृदया … उलट फिरविताना
काल तुला पाहिले मी ......

काजळी बने ही वात दिवा लावताना
काळीज हे काळे पडले प्रीत चेतताना
का जळी न मीन मी झालो … दव हे सांडताना
काल तुला पाहिले मी ......                                 

ओसरली लाट कशी ही पुन्हा उसळू पाहे
गीत विरून वाऱ्यावरती मुका उगी राहे
स्वप्न पुन्हा सत्यामधले … स्वप्न लोचनांना
काल तुला पाहिले मी ...... डाव मांडताना
पापणीत अलगद टिपले मुक्या भावनांना


Monday, 1 July 2013

मैं भी ईश्वर ... तू भी ईश्वर



मैं भी ईश्वर ... तू भी ईश्वर
फिर मैं ..... मैं क्यू ?
और तू .... तू क्यू ?

क्या है जो मुझे तुमसे दूर करता है?
क्या है जो तुम्हे मुझसे दूर रखता है?

कौन जान पाया है?
कौन जान पायेगा?
किसने ये बनाया है?

मैं जानता हुं के मैं कुछ नही जानता
मैं कभी जानता हुं के मैं कुछ कुछ हुं जानता
मैं तभी जानता हुं के मैं सब कुछ नही जानता

क्या मैं जानना चाहता हुं सब कुछ  ..... क्या है ये सब कुछ?

कौन जान पाया है?
कौन जान पायेगा?

ये वो जान पाता है ....
जो पहले ये जान लेता है के
"मैं जानता हुं के मैं कुछ नही जानता"

ऐसे भी  है .... जो सब कुछ है जानते
क्या सचमुच वे सब कुछ है जानते?
या वे जानते नही के "वे नही जानते"?

उन्हे कौन बतायेगा के  "वे नही जानते के वे क्या जानते है"

फिर कैसे कहे ...किससे कहे ... कौन कहे
के सचमे ... जो जानते है
"वे नही जानते के वे क्या जानते है"

कुछ ना जानना भी कितना अच्छा था
सब किस्मत का खेल था
..... नसीबोका मेल था

कुछ जान लिया .... फिर मैं जान गया
के ये मेराही खेल था ... मेरेही कर्मोका मेल था

मेरे कर्म मेरे साथ है ... पर क्या
मेरे कर्म मेरे हाथ है?

मेरे कर्म उनके हाथ है
जिनके हाथ मेरे साथ है

फिर कैसे कहे के .... 
जो फल मुझे मिला ...
उसमे कितना मेरा है
और कितना उनका  ...
जिन्होने अपने कर्मोको
मेरे हाथमे थोप दिया?

मै जानकर अंजान बन रहा हुं
मै देखकर अनदेखा कर रहा हुं
मै सुनकर अनसुना कर रहा हुं

तूनेही तो कहा था

बंद आंखसे देख तमाशा दुनियाका


योद्धा

प्रिय मना, 

आयुष्यात अनेक छोट्या छोट्या गोष्टी घडतात. काही चांगल्या, काही वाईट _ ! माणूस नेहमी चांगल्या गोष्टी अल्प-काळ लक्षात ठेवतो. वाईट गोष्टी मात्र त्याच्या कायम स्मरणात राहतात. विशेषतः आपली प्रिय व्यक्ती आपल्या मनासारखी  वागत नसेल तर फार राग येतो. पण प्रत्यक्षात या गोष्टी खूप क्षुल्लक असतात. यांना कवटाळून जगणे शक्य नसते.

आपली प्रिय व्यक्ती हसतमुख असली कि किती बरं वाटतं. पण जर ती गंभीर झालेली दिसली कि लगेच काही serious झाले आहे असे गृहीत धरायचे नसते.  त्याही व्यक्तीला मन असते. तिची स्वतंत्र मते असतात. तिच्या मनावरही काही आघात होऊ शकतात. माझ्यासारखा एखादा वर्षानुवर्षे आघात सहन करूनही हसत राहतो. त्याचा परिणाम एखाद्या क्षणी तो गंभीर होण्यासारखा असू शकतो. वर्षानुवर्षे वाहणारी जखम असते ती _! एका दिवसात बरी होईल?

साधं बोट कापलं तर आमटी भात कालवताना बोटाला झोंबते. पण म्हणून कोणी आमटी घेणे सोडत नाही. तू म्हणशील, "चमचा वापरा". पण ज्यांची चमचा घेण्याची ऐपत नसते त्यानां हातच  वापरावा लागतो. अशा वेळी वेदना चेहऱ्यावर उमटली तर समोरच्याने मानसीक तणाव घ्यायचा का हसून धीर द्यायचा _ जखमेवर फुंकर मारायची?

वेडे, आयुष्याच्या वाटेवर चालताना अशा अनेक छोट्या मोठ्या वेदना सहन कराव्या लागतात. त्या आपल्या आपल्यालाच सहन कराव्या लागतात. समोरच्याच्या वेदना आपण घेऊ शकत नाही कि आपल्या त्याला देऊ शकत नाही. आपण समोरच्याला मलमपट्टी करायची असते. त्याच्या जखमेवर मायेची फुंकर घालायची असते. वेदना मात्र त्याची त्यालाच सहन करावी लागते. 

मला जे काही होतंय, ते का होतंय, हे प्रत्येकाला कळू शकते. खरं तर प्रत्येकाला ते माहिती असतं. त्याच्याच कृतीत ते दडलेलं असतं. पण ते नेमकं नंतर समजतं. आधी माहिती झालं तर तो ते टाळू शकतो. कमीत कमी तसा प्रयत्न तरी करू शकतो.

माझी सोबत करायची असेल तर लक्षात ठेव ... मी जे करतो त्याचे परिणाम भोगायची माझी नेहमी तयारी असते. माझं आयुष्य मला जगायचं ते योद्धा म्हणून ... माझ्यावर येणारे बाण झेलताना कितीही वेदना झाल्या तरी त्या मीच सहन करेन. पण ढाल म्हणून कोणाला समोर उभे करणे मला जमणार नाही. तुला बनायचे असेल तर माझी सारथी हो, माझे बाण माझा रथ चालवून चुकव पण ढाल बनून झेलू नकोस. माझा स्वाभिमान दुखावला जाईल.

या अशा गोष्टींना पर्याय नसतो. त्या घडणारच _ थोडा राग येणारच. आपल्या प्रिय व्यक्तीच्या वेदना आपण वाटून घेऊ शकत नाही, या अगतिकतेमुळे वाईटही वाटणार. अशा वेळी आपलं हास्य समोरच्या व्यक्तीला किती आनंददायी ठरतं याची तुला कल्पना येणार नाही. हसून पाहा _ मग कळेल. वेडे तुझं हसणं हे माझं औषध, माझं सर्वस्व आहे. जशी तू माझं  हसणं पाहून  सर्व दुःखद क्षणांना विसरतेस, नवीन क्षणांना धैर्याने सामोरी जातेस तसेच माझेही आहे. त्या हसण्याने जगण्याची उमेद, उत्साह मिळतो. मग माझ्याकरता तुला इतकं नाही जमणार?

तुझा,
शैली