Tuesday 2 July 2013

छकुलं



अले माझ छकुलं दुडूदु़डू धावलं ।।
पकडु मी गेले त्याला मला नाही गावलं ।। ध्रृ ।।

छकुल्याचे गाल .. गोरेगोरे पान ।।
पाणीदार डोळे .. टपोरे छान ।।
गालावर खळी कसं खुदकन हासलं ।।
पकडु मी गेले त्याला मला नाही गावलं ।। १ ।।

छकुल्याच्या फेट्यामधे मोरपीस खोवले ।।
सारे त्याच्या तालावर थुईथुई नाचले ।।
बोबड्याशा बोलावर सारं जग भाळलं ।।
पकडु मी गेले त्याला मला नाही गावलं ।। २ ।।

मुखात घालुन मुठी कशा चोखी ।।
छकुल्याच्या बाळलीला अशा कोटी कोटी ।।
मुठीमधे छकुल्याच्या सारं जग मावलं ।।
पकडु मी गेले त्याला मला नाही गावलं ।। ३ ।।