Sunday, 21 July 2013

गुरुपदी रमला






जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला

दैन्य, दुःख, दारिद्रय ... विळख्याने पिडला
कर्मफला भोगवटा ... कधी कुणा टळला?
जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला

रावा भीती लक्ष्मी क्षती ... रंक क्षुधे पिडला
भय हरण्या राव - रंके ...कधी कुणा स्मरला?
जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला

मदनबाण काम पीडे ... हृदयी व्याकुळला
कामक्रीडा ध्यास मनी ... कधी कुणा फळला?
जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला

मोक्ष मिळे ज्यास तया ... जन्म मृत्यू टळला
मोक्षाचा मार्ग कसा ... कधी कुणा कळला ?
जो गुरु पदी रमला ... भवसागरी तरला



No comments: