Tuesday 13 August 2013

|| श्री स्वामी समर्थ - आरती ||

मूळ वडाचे कूळ सांगोनी जगता उद्धारी ||
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||धृ||

कामक्रोधमदमत्सरमाया बसलो कवटाळूनी
धूडकावूनी तुज नाम न घेई म्हणे मीच ज्ञानी
अज्ञानी मी पाप करी .. परी क्रोध न मजवर धरी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||

निर्मळ भक्ती मला जमेना कशी करू प्रार्थना
संसाराचा मोह सुटेना कशी करू अर्चना
भान हरपले भवसागरी तरी उचलुनी मजला धरी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||

सरस्वतीची वीणा मंजुळ कवन तुझेच करी
स्वामी समर्था तुझ्या पाऊली लक्ष्मी येई घरी
गौरी हर हर हरण करी मम दुःखाचे झडकरी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||

गौरीनंदन गण गण गणपती मोहक नृत्य करी
डम डम घण घण शंखनाद जणू अनंत वाजे ऊरी
उदे उदे जगदंबा माते हृदयी वास करी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||

No comments: