|| श्री स्वामी समर्थ ||
जे योगी, संत, स्वामी
असे थोर सत्पुरुष
इतिहासात होऊन गेले
त्यांना एक व्यक्ती
न मानता मी
शक्ती मानतो. जर
शक्ती नष्ट होत
नाही तर ते
योगी नाहीसे झालेले
नाहीत. ती शक्ती
ते विशिष्ट शारीरिक
रूप सोडून दुसऱ्या कुठल्या तरी
शक्तीत रुपांतरीत (converted) झालेली आहे. ती
याच वातावरणात अस्तित्वात
आहे. आपण जर
शोध घेतल्यावर ती
शक्ती आपल्याला सापडू
शकते.
आता याचा शोध
कसा घ्यायचा ?
जसे साधक या
शक्तीचा शोध घेतात
तसेच या शक्ती
देखील साधकांचा शोध
घेत असतात. साधना
जेंव्हा विशिष्ट पातळीवर पोहोचते
तेंव्हा अशा शक्ती आपोआप त्या साधकाशी
संपर्क साधतात. "जेंव्हा
योग्य शिष्य तयार
होतो तेंव्हा त्याला
गुरु आपणहून प्राप्त
होतो” हा गुरु
शिष्य संबंधातील एक
निसर्गनियम आहे.
जी साधना आपण सहजपणे करू शकतो ती
आपल्याला केंव्हाही अनुकूल ठरते
आणि म्हणूनच तीच
साधना सुरु ठेवावी.
ध्यान, धारणा हे काहीसे कठीण विषय
आहेत. इथे मार्गदर्शनाची गरज भासते. चूक झाल्यास विपरीत परिणाम घडू शकतात. पण आरती,
जप, भजन, नामःस्मरण
यासारख्या सोप्या मार्गावर प्राथमिक
अवस्थेत असताना थेट मार्गदर्शनाची गरज
नसते. कोणताही चांगला
शिक्षक (साधक नव्हे) आपल्याला
यात मार्गदर्शन करू
शकतो.
आपण प्रथम नामःस्मरण पाहू. यात कशी
प्रगती किंवा अधोगती होते ते
अभ्यासायचा प्रयत्न करू.
Energy never get destroyed. It can be converted from one
source to another. The form is changed but energy always exists.
मग आजवर ज्यांनी
नामस्मरण केले ते
सारे या वातावरणातच
असायला हवे. ते
नष्ट होऊ शकत
नाही. पण विखुरलेल्या
स्वरूपात आहे. वातावरणात
या कणांचे समुदाय
अस्तित्वात असतात. जसे काही
विशिष्ट देवळात गेले कि
आपल्याला खूप मंगल,
प्रसन्न वाटते. तर्कही विशिष्ट
ठिकाणी आपल्याला अस्वस्थ वाटते.
तिथे थांबवत नाही.
हे कण Positive (मंगल) आणि Negative (अमंगल)
असे दोन्ही प्रकारचे
असतात. माणसांच्या आचार आणि
विचारांवर त्याच्याकडे आकर्षीत होणाऱ्या कणांचा प्रकार अवलंबून
असतो. साधक जेंव्हा
साधना करतो तेंव्हा
हेच विखुरलेले कण
(नामाचे/ ज्ञानाचे)
त्याच्याभोवती जमा होतात.
या कणांचा समुदाय
जसा जसा वाढू
लागतो तसा तसा
त्याच्या भोवतीच्या वातावरणात फरक
पडू लागतो. चांगल्या विचाराने प्रेरित
लोकांभोवती Positive कण जमा
होतात आणि कुविचाराने
प्रेरित लोकांभोवती Negative. सर्वसाधारण
माणसे कोणत्या ना
कोणत्या प्रभावाखाली दोन्ही प्रकारचे
विचार करत असतात.
त्यांच्या भोवतीचे वातावरण अशा
दोन्ही प्रकारच्या कणांनी भारलेले
असते.
योग्य प्रकारे साधना
केल्यावर अंतर्शक्ती जागृत होते.
मात्र त्या शक्तीला आपण
ज्या आचार विचारांची
जोड देऊ, तसे
तिचे रूप असते.
माणसांचे आचार विचार
Constructive असतील तर Positive कण
जमा होत जातात.
मात्र आचार विचार
Destructive असतील तर Negative कणदेखील जमा
होतात. जसे चुंबकाकडे
लोखंडाचा कीस आकर्षीत
होतो तसे हे
कण साधकाकडे आकर्षीत
होतात.
आता आरती, भजन यांचा विचार करू.
No comments:
Post a Comment