१९९५
नशिबाने म्हणा वा पूर्वपुण्याईने .... आयुष्यात अध्यात्मिक मार्गातली एक अधिकारी व्यक्ती आली. तिच्या पाठीमागे देवीची साडेतीन शक्तिपीठे उभी आहेत असे म्हटले जात असे. माझ्या हातून त्या व्यक्तीची काही थोडी फार सेवा घडली. मनात त्याबदल्यात काही अपेक्षा नव्हती.
असेच एकदा आम्ही सारे जेवायला बसले असताना त्या व्यक्तीने मला विचारले, "मला तुला काही तरी द्यायचे आहे. बोल तुला काय हवे - छत्री की छत्र?"
मी उत्तरलो, "मला यातले काही काळात नाही. मी जे केले ते काही मिळावे या अपेक्षेने नाही. त्यामुळे मी काही मागू शकत नाही आणि मागू इच्छित नाही."
त्या व्यक्तीने तिथे उपस्थित असलेल्या एका दुसऱ्या व्यक्तीशी बोलून मला सांगितले, " जा .. तुला छत्र दिले."
त्या दिवसापासून मला माझ्याभोवती सतत एक आवरण जाणवत असते. मी जे काही करतो ते करण्यासाठी मला कोणी तरी सांगत असते. मला असे जाणवते की मी काही करत नाही. जे होते ते आपोआप होते.
एक दिवस त्या व्यक्तीने मला सांगितले, " तुला खूप प्रश्न पडतात ना? जा ... तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील."
त्या दिवसानंतर मला कोणताही प्रश्न पडला की त्याचे उत्तर त्याच प्रश्नाच्या हातात हात घेऊन येते. प्रश्न हा प्रश्न राहातच नाही. इतरांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबाबत किंवा त्यांना पडणारे प्रश्नदेखील मी माझे म्हणून स्वीकारले की त्याची उत्तरे किंवा विश्लेषण लगेच समोर उभे राहते.

________________________________________________________________
एक दिवस त्या व्यक्तीने मला सांगितले, " तुला खूप प्रश्न पडतात ना? जा ... तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील."
त्या दिवसानंतर मला कोणताही प्रश्न पडला की त्याचे उत्तर त्याच प्रश्नाच्या हातात हात घेऊन येते. प्रश्न हा प्रश्न राहातच नाही. इतरांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबाबत किंवा त्यांना पडणारे प्रश्नदेखील मी माझे म्हणून स्वीकारले की त्याची उत्तरे किंवा विश्लेषण लगेच समोर उभे राहते.
No comments:
Post a Comment