१९९५ - स्वामी विवेकानंद
आता मी ध्यान एकाग्र करून बसू लागलो. चित्त आपोआप एकाग्र होऊ लागले. भोवतीचे माउलींचे आवरण विरळ होत गेले. काही दिवसांनी नवे आवरण जाणवू लागले.
बसण्याची पद्धत सहजपणे बदलत गेली. मी वेगवेगळ्या मुद्रांमध्ये बसत होतो. प्रत्येक बसण्याच्या पद्धतीचे वेगवेगळे अनुभव येत होते. त्याचे फायदे आणि तोटे कोणीतरी मला सांगत होते. कानात काही ऐकू येत नव्हते. पण थेट मनात शब्द उमटत होते.
एखाद्या योग्याने कसे संयत असावे? योगांचे प्रकार कोणते? कोणत्या योग्याने कोणती साधना करावी? ध्यान कसे लावावे? कोणत्या पद्धतीचे कसे फायदे होतात आणि कोणते तोटे होतात? हे सारे कोणीतरी सांगत होते. मनात आपोआप सांगणाऱ्याचे नाव उमटत होते .... "स्वामी विवेकानंद"! मला जे उमजत होते ते बरेचदा प्रचलित गोष्टींपेक्षा खूप वेगळे होते.
त्यांनी सांगितले की "जगातले बहुतांश ज्ञान नष्ट झाले आहे. आज जे सांगितले जाते ते लोकांनी आपल्या स्वार्थापोटी मूळ ज्ञानाची केलेली भ्रष्ट नक्कल आहे. माझ्यापाशी असलेले ज्ञान हे अल्पस्वल्प आहे. त्याच्या कित्येक पटीने पसरलेला ज्ञानाचा महासागर अजून बाकी आहे."
काही दिवसात मला मी ध्यानाला बसलेला असताना चर्चमध्ये बसलेला आहे असे जाणवू लागले.
No comments:
Post a Comment