१९९७ नोव्हेंबर
ध्यानाला बसल्यावर ……
माथ्याच्या ऊर्ध्वभागी गोल कमळ फुलले होते. कमळाच्या मधोमध _ की मस्तकाच्या मधोमध _ तांबडा पदार्थ _ जसा एखाद्या खदखदणाऱ्या ज्वालामुखीच्या मधोमध असणारा लाव्हारस _ तो द्रव आहे की घट्ट _ की लिबलिबीत ? तांबूस पिवळा _ त्यावर अधांतरी एक प्रकाशाचा स्तंभ _ दुधी रंगाचा _ की पांढरा सफेद _ त्या स्तंभावरून उर्ध्व दिशेने माझा प्रवास सुरु _ एकदम मधोमध …. अचूकपणे _ स्तंभाच्या भोवताली कडी/ चक्रे _ जशी शनि ग्रहाच्या भोवती असतात.
त्या चक्रात _ की वावटळीत _ अत्यंत वेगात गोल गोल फिरणारे धुलीकण _ त्याचबरोबर अनेक माणसे व योगी _ ते पथभ्रष्ट झालेत (मनात कोणीतरी सांगतंय) _ मोहात अडकलेली माणसे _ किंवा आणखी कशात तरी अडकलेली _ माझा प्रवास मधल्या प्रकाश स्तंभामधून सुरूच _ वर पुन्हा एक वावटळ _ आणखी लोक _ त्यात अडकलेल्या माणसात ओळखीचे चेहरे _ मातुल गृहीचे, पितृगृहीचे नातेवाईक _ मोठे मोठे योगी, साधक _ ज्यांच्या नावाची सध्या जगात चर्चा अहे. यांनी तर प्रचंड साधना केलीय. तरीही इथेच? _ प्रवास सुरुच _ मधेच या वावटळीच्या गोलामध्ये एक निळी प्रकाशशलाका सुरु होते. ती दोन तीन कड्यांमधून वर जाऊन कड्यांच्या बाहेर जाते आणि संपते _ काय आहे ? _ प्रवास सुरूच _ कडबोळ्याप्रमाणे गोल असणारी ही कडी त्यात बरोबर मध्ये काहीही नाही. तिथून माझा प्रवास सुरूच _ अखेर या साऱ्या कड्यांना पार करून मी बाहेर _! इथे काहीच नाहीय.
No comments:
Post a Comment