१९९७ - नाथसंप्रदाय
आता ध्यानाला बसल्यावर
मला मी धुनीजवळ किंवा शेकोटीजवळ बसून चिमटा वाजवताना दिसू लागलो.
अंगावर कधी
भगवी तर कधी काळी पायघोळ कफनी असे तर कधी रुद्राक्षांच्या माळा आणि नाथपंथी कफनी
.... धुनीजवळ बसून कधी चिंतन करीत असे .... कधी ध्यानात मग्न झालेला असे .... तर
कधी काही नामःस्मरण चाललेले असे.
मी एकटा कधीच नसे.
त्या धुनिभोवती माझ्यासारखेच काही जण बसलेले असत. आमची एकाच प्रकारची साधना
चाललेली असे. कधी गम्य तर कधी अगम्य भाषेत ते काही सांगत असत. आपण काय करतोय आणि
ते कसे करावे हे मनात, शरीरात भरवले जात असे.
कधी कधी समोरची व्यक्ती
दिसताच मनात त्यांची नावे उमटत. ठळक आठवणारी नावे आणि शरीरयष्टी दोनच ... श्री मच्छीन्द्रनाथ
आणि श्री जालन्दरनाथ ! तिसरी व्यक्ती बहुदा गोरक्षनाथ किंवा कानिफनाथ .. नक्की आठवत
नाही. पण या व्यक्ती एकापेक्षा जास्त वेळा दिसल्या.
आता ध्यानामध्ये मन
अधिकाधिक एकाग्र होऊ लागले.
No comments:
Post a Comment