१९९६ - गजानन महाराज आणि गाडगेबाबा
परमहंसांनी देवीच्या मातृत्वाला हात घालण्याची, हाक मारण्याची, साद घालण्याची शिकवण दिली. तिला अभिप्रेत असलेली पुत्राची हाक कशी मारावी ते शिकवले म्हणूनच तिचे हे दर्शन होऊ शकले.
परमहंसांनी देवीच्या मातृत्वाला हात घालण्याची, हाक मारण्याची, साद घालण्याची शिकवण दिली. तिला अभिप्रेत असलेली पुत्राची हाक कशी मारावी ते शिकवले म्हणूनच तिचे हे दर्शन होऊ शकले.
नंतर काही काळ कोणीतरी कानात जोरात ओरडायचे "गण गण गणात बोते" _ काही दिवस हे सतत चालू राहीले. अगदी कानठळ्या बसतील अशा गगनभेदी आवाजात हा जप कानात आणि मनात चालू असायचा. पण तो आवाज कधीही असह्य झाला नाही. उलट सारे आयुष्य सुसह्य झाले. त्या काळात मी सर्वांशी नेहमीप्रमाणे बोलत असलो तरी मनात चक्क "मले .. तुले .. मी नाई बा ... " अशा स्वरूपाची तुटक वाक्ये चालू असायची. त्यामुळे इतरांशी बोलताना शब्द जपून वापरावे लागायचे. कधी कधी चुकून याच भाषेत शब्द तोंडातून निसटून जायचे आणि लोक एखाद्या वेड्याकडे पाहावे तसे माझ्याकडे पहायचे.
साधारण याच काळात संत गाडगेबाबा यांच्याही शिकवणीचा लाभ झाला. कधीही न ऐकलेली खानदेशी - वऱ्हाडी अशी कुठली तरी भाषा कानात ऐकू यायची _ मनात उमटायची. मग लोकांशी बोलताना तसेच बोलावेसे वाटायचे. बोलण्यावर खूप नियंत्रण ठेवावं लागे. मग बोलणच कमी केलं. बऱ्याच जणांना मी शिष्ट व स्वतःला शहाणा समजणारा वाटलो असेन. पण खरं कारण कसं सांगणार?
आता मला हाती चिपळ्या धरल्याचा भास होऊ लागला.
No comments:
Post a Comment