१९९६ - येशु ख्रिस्त
काही दिवसात मला मी ध्यानाला बसलेला असताना चर्चमध्ये बसलेला आहे असे जाणवू लागले.
जरी मी अर्धपद्मासन घालून बसलेला असे तरी मला भासत असे की मी एका टेबलासमोर गुढगे दुमडून बसलेला आहे. हाताचे पंजे एकमेकात गुंफून त्या टेबलावर कोपर टेकवून मी डोळे बंद करून प्रार्थना करत आहे. कधी कधी भास होत असे की मी घरात ध्यानाला बसलेला नसून कुठे तरी चर्चमध्ये बसलेला आहे.
ध्यानातून जागे झाल्यावर रात्री झोपेपर्यंत जगातल्या प्रत्येक जीवाबद्दल करुन दाटून येत असे. प्रत्येकाबद्दल ... अगदी अनोळखी लोकांबद्दलदेखील ममत्व वाटत असे. कोणी भांडत असतील किंवा एकमेकांविषयी उलटसुलट बोलत असतील तर मनात शब्द उमटत असत, "हे ईश्वरा, ते काय करत आहेत ते त्यांना माहिती नाही. त्यांना क्षमा कर."

मला लक्षात आले की मी आता येशूच्या आवरणात आहे आणि तो किंवा ती शक्ती माझ्यात काही तरी भरत आहे.
नंतर काही काळाने एक पुस्तक वाचनात आले. त्यात स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या काही गोष्टी होत्या ज्या माझ्या अनुभवांशी तंतोतंत जुळत होत्या. तसेच असेही वाचनात आले की स्वामीजींसोबत काही काळ येशु राहीला होता. आणि मला माझ्या अनुभवांचे गूढ उमगले .. प्रमाण मिळाले.
No comments:
Post a Comment