Wednesday, 28 August 2013

Same To Same मुखडा

गाण्याला चाल लावणे ही एक दुर्मिळ कला आहे.
संगीतकार चाल देताना बरेचदा एकच रागावर दोन-तीन-चार गाणी करतो आणि आपल्या कानांना ती अगदी सारखीच वाटतात.
बरेच संगीतकार चक्क एकमेकांच्या चाली ढापतात.
कधी कधी अगदी एकच चाल दोन संगीतकारांनी कुठून तरी ढापली आणि आपल्या गाण्यांना वापरली हेदेखील आपण पहिले. आठवते ना .... "जुम्मा चुम्मा दे दे" आणि "तम्मा तम्मा लोगे" ? आपलीच चाल कशी मूळ चाल आहे यावर त्यांचे प्रवचन देखील ऐकले.

कधी कधी एकच चाल दोन वेगवेगळ्या गाण्यांना लावलेली देखील आपण ऐकली ना? पहा आठवून
हृदयनाथ मंगेशकर
जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजती  - जैत रे जैत
होली आयी होली आयी होली आयी होली रे - मशाल
किंवा ताजे उदाहरण ...
अजय अतुल 
कोंबडी पळाली - जत्रा
चिकनी चमेली – अग्निपथ

आज मी जी गाणी सांगणार आहे ती वेगवेगळ्या काळात अगदी सेम टू सेम मुखडा वापरून केलेली गाणी आहेत.

मदन मोहन
आप की परछाइया - १९६४
गीतकार - राजा मेहदी अली खान
गायक - मोहम्मद रफी
पडद्यावरील कलाकार - धर्मेंद्र, सुप्रिया चौधरी
यही ही तमन्ना, तेरे दर के सामने
मेरी जान जाये मेरी जान जाये

राहुल देव बर्मन
नरम गरम  - १९८१
गीतकार -  गुलझार
गायक - आशा भोसले
पडद्यावरील कलाकार - स्वरूप संपत, अमोल पालेकर
हमे रास्तोंकी जरुरत नही हैं
हमे तेरे पावोंके निशान मिल गये हैं

राहुल देव बर्मन
सागर   - १९८५
गीतकार -  जावेद अख्तर
गायक - किशोर कुमार, लता मंगेशकर
पडद्यावरील कलाकार - डिम्पल, ऋषी कपूर
सागर किनारे, दिल ये पुकारे
तू जो नही तो मेरा कोई नही हैं

तीनही गाणी पूर्ण ऐका आणि आपले मत कळवा.

Wednesday, 14 August 2013

ईश्वर



ईश्वर एक आस हैं
ईश्वर एक प्यास हैं
ईश्वर एक एहसास हैं

ईश्वर एक साधना हैं
ईश्वर उपासना हैं
ईश्वर आराधना हैं

ईश्वर कभी नारी हैं
ईश्वर कभी कुमारी हैं
ईश्वर कभी बुढ्ढा हैं
ईश्वर कभी बच्चा हैं
झूठे के लिये अच्छा हैं
अच्छे के लिये सच्चा हैं

ईश्वर एक दर्पण हैं
ईश्वर एक अर्पण हैं
ईश्वर समर्पण हैं

ईश्वर बहोत प्यारा हैं
ईश्वर सबसे न्यारा हैं
उसे पाना एक मजा  हैं
उसे पाना कभी एक सजा हैं

ईश्वर एक मेल हैं 
ईश्वर एक खेल हैं
सारी दुनिया बंद हैं जिसमे
ईश्वर ऐसी जेल हैं



Tuesday, 13 August 2013

|| श्री स्वामी समर्थ - आरती ||



मूळ वडाचे कूळ सांगोनी जगता उद्धारी ||
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||धृ||

कामक्रोधमदमत्सरमाया बसलो कवटाळूनी
धूडकावूनी तुज नाम न घेई म्हणे मीच ज्ञानी
अज्ञानी मी पाप करी .. परी क्रोध न मजवर धरी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||

निर्मळ भक्ती मला जमेना कशी करू प्रार्थना
संसाराचा मोह सुटेना कशी करू अर्चना
भान हरपले भवसागरी तरी उचलुनी मजला धरी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||

सरस्वतीची वीणा मंजुळ कवन तुझेच करी
स्वामी समर्था तुझ्या पाऊली लक्ष्मी येई घरी
गौरी हर हर हरण करी मम दुःखाचे झडकरी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||

गौरीनंदन गण गण गणपती मोहक नृत्य करी
डम डम घण घण शंखनाद जणू अनंत वाजे ऊरी
उदे उदे जगदंबा माते हृदयी वास करी
त्या पतितपावन नरसिंहाचे ध्यान मनी मी धरी ||||